STEAMBOAT

Popular Science talk series initiated by HBCSE, TIFR

Latest Talk Season: 2 | Episode: 12

आपल्यातले सूक्ष्म विश्व

Date: 08/10/2023   Time: 11:00:00

   Watch on YouTube

Language: Marathi

SPEAKER
Dnyaneshwari Joshi

ज्ञानेश्वरी जोशी, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या जीवशास्त्र कक्षात प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.  त्यांच्या प्रमुख कार्यामध्ये नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर अंडरग्रेजुएट स्टुडंट्स (NIUS) आणि बायोलॉजी ऑलिम्पियाड या दोन्हींसाठी प्रयोगांचे मानकीकरण समाविष्ट आहे.

आपल्यातले सूक्ष्म विश्व

मानवाचे शरीर म्हटल्यावर आपण आपले अवयव, किंवा आपल्या पेशींचा विचार करतो. पण तुम्हाला माहित आहे का, की आपण स्वतःच्या शरीरात एकटे नसतो, तर कोणत्याही वेळी आपल्यामध्ये ३० ट्रिलियन (३० लाख कोटी) पेक्षा जास्त सूक्ष्मजीव राहतात! खरं तर, हजारो विविध प्रजातींचे जीवाणू आणि बुरशीं आपणामध्ये राहतातं व आपण एका लहान परिसंस्थेसारखे आहोत. इतकेच नाही तर ह्या सूक्ष्मजीवांचा समुदाय (मायक्रोफ्लोरा) आपल्या आहारानुसार बदलतो आणि आपल्या शरीरातील प्रक्रियांसाठी जबाबदार असतो. हे सूक्ष्मजीव आपल्यासोबत आपल्यावरच नियंत्रण कसे आणत असतील याबद्दल जाणून घेण्यासाठी या महिन्याच्या स्टीमबोट मध्ये भेटू या!